अखंड हरिनाम सप्ताह चे औचित्य साधून आरोग्य तपासणी

 अखंड हरिनाम सप्ताह चे औचित्य साधून आरोग्य तपासणी




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
कराडे खुर्द,२५  ऑगस्ट,

               मानवी मनामध्ये परिवर्तन होण्यासाठी  संत,महात्मे यांनी मोक्ष प्राप्ती साठी, भगवंताचे नामस्मरण करण्यांचे विविध माध्यम सांगितले. असून या माध्यमातून मनाला समाधान मिळत असतो.या विचारांतून कराडे खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन दर वर्षी प्रमाणे होत असते.या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये मेडीकल तपासणी करण्यांचे नियोजन करण्यात आले.यावेळी  ग्रामस्थ आलेल्या वारकरी,यांनी स्वताची आरोग्य तपासणी करून घेतली.कारण शरीर निरोगी असेल ,तर भगवंताचे नामस्मरण सहज पणे होत असते.
         

             
आज सातत्याने महाघाई वाढत आहे,त्यातच घरचे भागविणे कठीण जात असतांना एखादे आजार झाल्यास आपण दुर्लक्ष करीत असतो,किंवा आपल्याला त्या आजारांची कल्पना नसते.मात्र ज्या वेळी आपणांस एखादे आजार होत असल्यांचे मेडीकल तपासणीत डॉक्टर सांगतात त्यावेळी आपण उपचार घेतो.किंवा तो आजार नियंत्रणात येत असतो.प्रत्येकांचे आरोग्य उत्तम रहावे,कुणालाही आजारांने त्रस्त होवू नये किंवा होत असल्यास त्यावर उपचार करणे सोपे जाते. या बाबीचा आभ्यास करून आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले.

               यावेळी सरपंच,भारती चितळे,उपसरपंच प्रमिला योगेश पाटील ,सदस्यां यशश्री मुरकुटे ,नलिनी कारंडे,संतोष म्हात्रे,मिनल ठोंबरे,माधुरी चितळे तसेच अनंत मोरे महाराज ,चंद्रकांत पाटील,काशिनाथ माळी,शंकर गोडीवाले बाळाराम पाटील,श्रीकांत पाटील,गोंधळी बाबा एकनाथ म्हात्रे  भानुदास माळी काशिनाथ पाटील,तसेच संजय टेंबे, शिवाजी माळी राजेश माळी अदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन