खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील यशवंत नगर रस्ता झाला खड्डे मुक्त

 खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील यशवंत नगर रस्ता झाला खड्डे मुक्त 

शिवसेना संपर्क प्रमुख हरीश काळे यांच्या सहकार्याने व माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ पाटील व माजी नगरसेविका वनिताताई हरीश काळे यांच्या 

प्रयत्नातून प्रभाग क्रमांक १० चे  रस्त्यावर पडलेले खड्डे भरले!





शिवाजी जाधव (पाताळगंगा न्यूज )
खोपोली : २५ ऑगस्ट 

                 खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील यशवंत नगर मधील ठिकठिकाणी रस्त्याला पडलेले खड्डे असल्यामुळे संपूर्ण परिसरात चिखलमय वातावरण झालेले दिसून येत होते. थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने नागरिकांना गणेशोत्सव आनंदी व उत्साह वातावरणात साजरा करण्यात यावा या उद्दात विचारांतून मा. नगराध्यक्ष सुनील पाटील आणि मा. नगरसेविका वनिताताई हरीश काळे यांच्या माध्यमातून रस्त्यावर पडलेले खड्डे यावर खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
             गणेश भक्तांना ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या मुळे त्रास होऊ नये म्हणून गणेशोत्सवा अगोदर खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंत नगर नंबर २, खोपोली नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांना गणेश उत्सव आनंदीमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात यावा तसेच गणेश भक्तांना रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये या उदात्त हेतूने गणेश उत्सवाअगोदर खोपोली नगरपालिका  नवनाथ कॉलनी, समर्थ नगर, पाण्याची टाकी या भागातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून प्रवास सुखकर व्हावा 
            गणेश भक्तांसाठी जाताना येताना कुठलाही त्रास होऊ नये या करिता हे खड्डे भरण्याची काम शिवसेना संपर्कप्रमुख हरीजी काळे यांनी स्वतः उपस्थित राहून कामगारांच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात खडी टाकून खड्डे भरून घेतले. ज्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया आहे व एच पी लाईन गेली आहे त्या ठिकाणी रस्ता करून देण्याची परवानगी नाही अशा ठिकाणी नगर परिषदेकडे पाठपुरवठा करून खडी टाकून घेतल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या त्रासातून तात्पुरत्या स्वरूपाची का होईना खडी टाकून खड्डे भरण्यात आल्याने गणेश भक्त व येथील रहिवासी यांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान