पाऊस थांबला, शेतकरी शेतात मग्न,पहाटेच्या वेळी बैलाच्या घुंगरांचा आवाजांने मन प्रसन्न
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ८ ऑगस्ट,
या वर्षी नियोजित वेळेवर हजेरी लावणी नाही.मात्र ज्या वेळी पाऊस आला.मात्र शेतकरी वर्गांच्या तोंडचा घास मात्र हिरावून घेत चालला होता.मात्र या पावसामुळे काही शेतकरी वर्गांची शेती या मध्ये वाचली त्यांनी आपल्या जवळ असलेल्या सर्जा राजाची जोडी घेवून पुन्हा शेतीच्या मशागतीला वळले आहे.पहाटेच्या वेळी घुंगरांचा आवाज मनाला स्पर्श करुन जात आहे.आणी आपल्या गोठ्यात असलेल्या बैल जोड्या घेवून बळीराजा शेताकडे वाटचाल करीत असलेले दृश्य सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.
आजचे तरुण शेतीकडे दुर्लक्ष करीत आहे.मात्र आपण पिढ्यान पिढ्या भात लागवड करीत असल्यामुळे तरुण वर्ग शेती करीत आहे.तालुक्यात भात लागवड अंतिम टप्यात आली असून काहीची भात लागवड पूर्ण झाली आहे.मात्र शेतीची कामे मात्र सुरु असतात.जसे बैलांना रोजच्या रोज शेतावर घेवून जावून चारा चारणे अदि कामे शेतकरी वर्ग मनापासून करीत आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी बांधव पावसाळी भात लागवड करीत असतात.यामुळे आठ महिने धान्याचा तुटकडा भासत नाही. शिवाय ज्या अल्प भुधारक शेतकरी वर्गांकडे बैल जोड्या नाही ते पेंढ्याचा उपयोग विक्री करून या माध्यमातून अर्थिक मिळवित असतात.शिवाय आपल्याला वर्षभर पुरेल ऐवढे धान्य ठेवून विक्री करीत असतात.यामुळे शेती ही बळीराजासाठी मोठी पर्वणी भासत असते.
वर्षाचे बारा महिने आपल्या जवळ असलेल्या बैलांना सांभाळून पावसाळ्यात त्यांचा वापर करण्यात येत असतो. शिवाय अन्य कामासाठी बैल गाडी यांचा मोठा उपयोग होत असल्यांचे शेतकरी वर्गांचे मत आहे.
0 Comments