पनवेल पोलीस वतीने पोलिस पाटील, महिला दक्षता समिती, आगामी सण उत्सव, सदस्य यांची समन्वय बैठक
संजय कदम
पनवेल : ८ ऑगस्ट,
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील ,महिला दक्षता समिती सदस्य, यांची समन्वय बैठक पनवेल तालुका पोलीस ठाणे, मंथन हॉल येथे घेण्यात आली.यावेळी आगामी सण उत्सवानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती, सण - उत्सव, पावसाळा, धरणे, धबधबे, अवैद्य धंदे, भाडेकरू, संशयित इसम वाहने इत्यादी बाबत सरक्षेच्या अनुषंगाने तसेच लोकसहभागातून हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसून गावाची सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरी. पोनी ( गुन्हे ) शेलकर व पोलीस उप निरीक्षक माधव इंगळे यांनी उपस्थितांना महत्वाच्या सूचना केल्या
प्रामुख्याने जेष्ठ नागरीक , महिला व लहान मुले यांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने लोक सहभागातून जास्तीत जास्त सी सी टीव्ही कॅमेरे बसविणे तसेच भाडेकरू ची माहिती देणे , येणारे सण उत्सव व सध्याची राजकीय परिस्थिती च्या अनुषंगाने गावातील विशेष घटना या बाबत माहिती देणे. ग्रामीण भागात गावठी दारू, अवैध धंदे, ईत्यादी माहिती देणे.सध्याचे पावसाळी वातावरण असल्याने पाणी थांबणारे ठिकाणे, धबधबे, धरणे, ईत्यादी ठिकाणी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.
त्याचे सुरक्षाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे कडून मनाई आदेश फलक प्रसारीत केला आहे. तसेच दरड कोसळणारे ठिकाणाची माहिती , पाणी साचणारे ठिकाण व त्यातून जीवित हानी होऊ नये याकरिता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलीस मदतीकरीता डायल 112 या क्रमांकावर संपर्क करण्यात यावा, तसेच प्रत्येक गावातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न असल्यास फोन द्वारे किंवा पोलीस पाटील यांच्या ग्रुप वर शेअर करावा बाबत माहिती देण्यात आली.
त्याच प्रमाणे संशयित इसम, बेवारस वाहन, संशयित वस्तू, ईत्यादी माहिती देण्याबाबत योग्य त्या सूचना यावेळी देण्यात आल्या . आयोजित बैठकीस हद्दीतील एकूण 35 पोलिस पाटील , महिला दक्षता समिती सदस्य उपस्थित होते.
0 Comments