रा.जि.प.शाळा,वडगाव च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला भातलागवड चा आंनद

 रा.जि.प.शाळा,वडगाव च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला भातलागवड चा आंनद




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : २ ऑगस्ट,

           
            गेले अनेक दिवस पाउस पडत असल्यामुळे शाळेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहिर करण्यात आली होती.मात्र पाउस शांत झाला.आणी विद्यार्थ्यांनी शाळेची वाट धरली.मात्र एक दिवस आभ्यासा शिवाय हा उपक्रम राबवून शेतात भात लागवडीचा उपक्रम रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव येथिल विद्यार्थी आणी शिक्षक यांच गावातील असलेले शेतकरी हरिभाऊ गडगे यांच्या शेतावर जावून प्रात्यक्षिके भात लागवड करण्यांचा अनुभव घेतला. यावेळी पहिले ते सातवी चे विद्यार्थी या ठिकाणी शेतात भात लागवड केली.

              शिक्षक सातत्याने विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून शिकवित असतात.की आपले आई - वडील,आजोबा भात शेती करतांना किती परिश्रम घ्यावे लागते. मात्र प्रत्येक्षात विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळावे,या उद्दात विचारांतून हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला.निसर्गाच्या सानिध्यात असलेली भात शेती आणी ती लागवड करतांना मिळालेला आनंद विद्यार्थी एकमेकांना सांगितले. मराठी शाळेत शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार घडावे,शिवाय शाळेत शिक्षण घेणारी सर्व मुळे शेतकरी बांधवांची आहे.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शेतीविषयक परिश्रम करण्यांची प्रेरणा मिळेल.
         

   यावेळी वडगांव येथिल शेतकरी हरिभाऊ गडगे,मुख्याध्यापक - सुभाष राठोडसर, वैजनाथ जाधव, करुणा ठोंबरे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आणि पालक व स्वयंपाकी काकू व माजी विद्यार्थी होते.भातलावणी कार्यक्रमानंतर सुरक्षित ओढ्यावर मनोसोक्त आनंद लुटला.
    


कोट 
शाळा व परिसर यांची योग्य सांगड घातल्यास शिकणे सोपे होते व शिकणे जगण्याशी जोडले जाते,ज्यामुळे मुलांना शिकण्यात गोडी निर्माण होते.
             सुभाष राठोड
    मुख्याध्यापक, रा.जि.प.शाळा,वडगाव

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन