खासदार राजन विचारे यांची लोकमान्य टिळक चौक मोफत वाचलयांस भेट,ग्रंथालायांचे व्यवस्थापक यांचे कौतुक

  खासदार राजन विचारे यांची लोकमान्य टिळक चौक  मोफत वाचलयांस भेट,ग्रंथालायांचे व्यवस्थापक यांचे कौतुक





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक : १ ऑगस्ट,

           लोकमान्य टिळक १ ऑगस्ट १९२० रोजी स्वर्गवासी झाल्यानंतर,त्यांच्याच नावांची ग्रंथालय ची स्थापना ९ ऑगस्ट रोजी करण्यात आली.चौक हे ऐतिहासिक वारसा लाभलेली ह्या बाजारपेठत  लोकमान्य टिळक मोफत वाचनालय असून,आज १०३ वर्ष या ग्रंथालय यांना पुर्ण झाली आहे.त्यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून त्यांच्या कार्याचा उजाळा दिला.यावेळी खासदार राजन विचारे यांनी ग्रंथालयास भेट देवून येथिल व्यवस्थापक यांचे कौतुक केले.

              चौक या बाजार पेठेत शेकडो वर्ष होवूनही आज ग्रंथालय सुरळीत पणे सुरु आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी नियमित वर्तमान पत्रे आणी पुस्तके वाचण्यासाठी या परिसरातील ग्रामस्थ येत असतात.त्याच बरोबर या ठिकाणी असलेल्या इर्शाळवाडी येथे दरड पडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले,त्यांच्या साठी श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी खासदार राजन विचारे उपस्थित होते.या दरडीतून वाचलेल्या नागरिकांची भेट घेवून आम्ही सातत्याने तुमच्या पाठीशी असून काही मदत लागल्यात मी सदैव तप्तर आहे.

          यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष  सुरेश वस्तराज यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली. विश्वस्त आणि सदस्य यांनी आदरांजली वाहिली,सेक्रेटरी सतीश आंबवणे,विश्वस्त- रजनीकांत शहा,ग्रंथपाल अभिजीत चौधरी कार्यकारिणी सदस्य अशोक चौधरी रंजना साखरे,ऐश्वर्या जोशी,अजिंक्य चौधरी,राजेश आंबवणे,प्रणित चौधरी,राजेन्द्र चौधरी,मनोज साखरे,वाचक वर्ग श्री. ए.आर.पाटील सर,गोविंद चव्हाण,मुरलीधर साखरे,अपर्णा श्रीनिवास वाळिंबे,पुनम चोगले,अशा आपटे, प्रज्ञा वस्तराज,अश्विनी भोईर, हर्षा महाडिक, ह.भ.प. भालचंद्र साखरे,पांडुरंग मोरे अदि उपस्थित होते.
         
               


          








Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन