टाटा स्टील कंपनी सुरक्षा विभाग व खालापूर पोलीस ठाणे यांचेकडुन रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
दीपक जगताप ( पाताळगंगा न्यूज )
खालापूर : ३१ ऑगस्ट,
दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असतांना, नागरिकांमध्ये जनजागृती करावी तसेच वाहतुकीचे नियम पालन करून आपल्या बरोबर दुसऱ्याचा जिव वाचवू शकतो.या उद्दात विचारांतून टाटा स्टील कंपनी व खालापूर पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून खालापूर फाटा, इसांबे फाटा या ठिकाणी दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देवुन वाहतुकीच्या नियमांचे सुचनापत्रिकांचे वाटप करण्यात आले.यावेळी त्यांस वाहतुकीच्या नियम समजवून सांगण्यात आले.
प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे टाळावे ,गाडी चालवताना नेहमी सिटबेल्ट लावावा, धोकादायक रस्ता क्रॉसिंग टाळावा, मद्यपान करून वाहन चालवू नये,वेग मर्यादा ओलांडू नका अश्या सूचना देत वाहक चालकांना पत्र देत जनजागृती करण्यात आली.
ह्यावेळी टाटा स्टील लि.खापोली चे सुरक्षा विभागाचे सिनीयर मॅनेजर विपीन थोरात, कार्पोरेट रिलेशन विभागाचे सिनीयर मॅनेजर कुशल ठाकुर व सुरक्षा स्टाफ तसेच खालापुर पोलीस ठाणेचे महिला पोलीस उपनिरीक्षक मनवर, पोह/हाके, पोह/जगधने, पोशि/समिर पवार बिटमार्शल अंमलदार पोशि/1626 पयेर, वाहतुक अंमलदार पोेह/तांडेल असे सहभागी होते.
0 Comments