रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने आदिवासी बांधवांना साहित्य वाटप
हनुमंत मोरे : ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली / वावोशी २८ ऑगस्ट
एक हात मदतीचा,चला आपण सुद्धा मदत करू या.....या प्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ गेले अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवित आहेत.संस्थेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज खालापूर तालुक्यातील शिरवली ग्राम पंचायतीच्या रानसई आदिवासी वाडीतील अंगणवाडी मुलांसह सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तरे, कंपास,वह्या,पाटी,पेन्सिल तसेच महिलांना साड्या व प्रत्येक घरात चादर,ब्लॅकेट अश्या वस्तुंचे वाटप केले.
रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे काम हे ऐरोली शहरातून सुरू आहे.या मंडळाचे अनेक सभासद आहेत.आपल्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी ऐरोली येथे सिडकोच्या माध्यमातून भुखंड घेऊन समाजभुवन तसेच आई तुलजाभवानीचे भव्य मंदिर उभारले आहे.या मंदिराचे पावित्र्य जोपासण्याचे काम संस्थेचे सर्व सभासद करीत असतात.आपल्यातील एकीचे बल काय करू शकते याचं उद्देशाने या सेवा संघातील सभासदांनी आपल्या जवळील पैसे एकत्र करून आदिवासी समाजातील गरजवंतांची गरज भागविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
या माध्यमातून त्यांनी आज खालापूर तालुक्यातील रानसई आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना जवळपास दोन लाख रूपये किंमतीच्या वस्तुंचे वाटप केले.यावेळी खालापूर तालुका शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष राजेश उर्फ राजू मोरे,शिरवली ग्राम पंचायतीचे माजी सदस्य बोडेकर,संजित भोसले, मिलिंद चव्हाण,मनिष भोसले आदी स्थानिक कार्यकर्त्यांसह संस्थेचे ऐंशी सदस्य उपस्थित होते.
कोट -
एक हात मदतीचा,चला आपण सुद्धा मदत करू या.....या प्रमाणे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघांच्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांना जी अनमोल मदत करण्यात आली आहे त्या मदतीने आम्ही भारावून गेलो आहोत.खरोखरच आई तुलजाभवानी या सर्व सएवएकऱ्यआंनआ उदंड आयुष्य देवो व अशीच सेवा अखंडपणे गोरगरिबांची होत राहो एवढेच यानिमित्ताने मी बोलू शकतो.
बोडेकर माजी सदस्य ग्रा.पं.शिरवली.
0 Comments