आर- 3 कोल्ही गावातील समस्या बाबत समाजसेवक बाळाराम नाईक यांचा पुढाकार

 आर- 3 कोल्ही गावातील समस्या बाबत समाजसेवक बाळाराम नाईक यांचा पुढाकार





पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : ९ सप्टेंबर,

 आर- 3 कोल्ही गावातील नागरिकानं रस्तयांची समस्या भेडसावत आहे. या समस्या बाबत समाजसेवक बाळाराम नाईक यांचा पुढाकार घेत पंच कमिटीसह सिडकोला निवेदन दिले आहे. यावेळी त्यांना या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले.
                  सिडकोने पुनवर्सन केलेले कोल्ही आर- 3 मध्ये बिल्डिंगची कामे ९०% पूर्ण झाली असून तेथील रस्त्याची कामे अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे येणारे जाणारे लोकाचे खूप हाल होत आहे. सिडकोने केलेली रस्ते गटारांची कामे ती पूर्णपणे नाहीशी झाली आहेत त्यामुळे गटारे मातीने भरली आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यामध्ये बरेच लोक पडून अपघात झाले असून पावसाचे पाणी साचून मच्छरचा पादुर्भाव वाढला आहे. 
                 डेंग्यू मलेरिया यासारखे रोग पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. यामुळे वित व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सिडकोने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाय योजना करावी ही अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी समाजसेवज बाळाराम नाईक अमृत भोईर, चंद्रकांत भोईर, प्रविण भोईर, गोविंदा घरत यांच्यासह गावातील पंच कमिटी उपस्थीत होते. 

Post a Comment

0 Comments

स्वच्छता विषयी पथनाट्य,राजिप शाळा वडगांव यांचा स्तुत्य उपक्रम