समाजमाध्यमारील द्वेष पसरवणाऱ्या मजकूराला बळी पडू नका,सण उत्सावात एकोपा टिकवा-उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांचे आवाहन

 समाजमाध्यमारील द्वेष पसरवणाऱ्या मजकूराला बळी पडू नका,सण उत्सावात एकोपा टिकवा-उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांचे आवाहन





पाताळगंगा न्यूज ( दीपक जगताप
खालापूर : ८ सप्टेंबर,

                आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर खालापूर पोलीस ठाण्यात शांतता आणि मोहल्ला कमिटीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सणासुदीच्या काळात सामाजिक सलोखा टिकून राहावा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीच्या सदस्यांनी जागृत राहण्याच्या सूचना विक्रम कदम यांनी दिल्या.
                   अनंत चतुर्दशीचे विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने दोन्ही समाजातील नागरिकांनी नियोजन करून मिरवणुका काढाव्या असे आव्हान देखील यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. समाज माध्यमावर प्रसारित होणाऱ्या द्वेष पसरवणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवून त्याबाबत पोलिसांना वेळीच माहिती द्यावी असे देखील कदम यानी सांगितले. 
               यावेळी शांतता कमिटी आणि मोहल्ला  कमिटीच्या सदस्याने दिलेल्या सूचनानुसार सर्व आवश्यकता उपायोजना करण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी उपस्थितांना दिले. या बैठकीसाठी शांतता कमिटीचे सदस्य खालापूरचे उपनगरध्यक्ष संतोष जंगम, ठाकरे गटाचे नेते एकनाथ पिंगळे ,सरकारी वकील राजेंद्र येरुणकर, मनोज कळमकर,अजीम मांडलेकर, यासीन भालदार, शशिकांत मोरे, प्रसाद पाटील, आसिफ जळगावकर, मोजम मांडलेकर, हनीफ धतुरे,हेमा चिंबूलकर, अजीम  यांच्या सह सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

टी.एन.एम.पब्लिक स्कूल असरोटी,विद्यालयाचे काम कौतुकास्पद नंदकुमार वाळंज