देशाची भावी पिढी घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे- इक्बाल हुसैन काझी

 देशाची भावी पिढी घडविण्यामध्ये शिक्षकांचे योगदान महत्वाचे- इक्बाल हुसैन काझी



पाताळगंगा न्यूज ( संजय कदम )
पनवेल : ९ सप्टेंबर,

            शिक्षक दिनानिमित्त पनवेल एज्यूकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज, पनवेल, याकुब बेग पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा पनवेल, पी. ई. एस. इंग्लिश स्कूल व जुनियर कॉलेज पनवेल, नेशनल उर्दू हायस्कूल तळोजा, नेशनल पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळा,तळोजा, अंग्लो उर्दू हायस्कूल, बारापाडा या शाळामधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ याकुब बेग शाळेच्या कॅम्पस मध्ये संपन्न झाला ज्यामध्ये सर्व शालेय कर्मचार्यांना सन्मानचिह्न देवून गौरविण्यात आले.
       कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने झाली. यानंतर याकुब बेग शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेजचे प्राचार्य आसीम पटेल यांनी केले. यानंतर सर्व शाळातील मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर संस्थेचे सचिव अलीम अमिरुद्दिन पटेल, खजिनदार माज शाहनवाझ मुल्ला,अंगलो उर्दू हायस्कूल बारापाडाचे चेअरमन नवीद अब्दुल कादिर पटेल,संस्था सदस्य जुबेर अब्दुर रज्जाक पित्तू,संस्थेचे उपाध्यक्ष अब्दुल मुकीत अब्दुल लतीफ काझी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
               आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष इक्बाल हुसैन काझी यांनी संस्था संचालित शाळामध्ये कार्यरत सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच ते करत असलेल्या कार्याची स्तुती केली व भविष्यातही असेच कार्य करत राहावे असे आवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मोहम्मद नूर हसनमिया पटेल,सदस्य साजिद नासीर पटेल, जव्वाद अब्दुल मुकीत काझी, यासर रईस दाखवे व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन याकुब बेग शाळेच्या सहाय्यक शिक्षिका शिरीन घारे यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य आसीम पटेल यांनी केले.

Post a Comment

0 Comments

दुर्गम भागामध्ये आरोग्य तपासणी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्थे चा पुढाकार