हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन तर्फे सुरक्षाराखी,उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक

 हेल्मेट परिधान न करणाऱ्यांना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन तर्फे सुरक्षाराखी,उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक 


दिपक जगताप ( पाताळगंगा न्यूज )
खालापूर : १ सप्टेंबर,



                  वाहनचालकांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे समजावून  यावर्षी रक्षाबंधन साजरी करण्यात आली. 
                 ३१ ऑगस्ट २०२३ रोजी बहीण भावंडांच्या नात्यातील गोडवा अधिक निर्माण होणारा  रक्षाबंधन हा पवित्र सण सालाबादप्रमाणे यंदाही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हे  ७ वे वर्ष असून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या क्रांतिजोत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे या विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात, तसेच  सामाजिक कार्यात स्वतःला पूर्ण झोकून विविध कार्यक्रम राबवत असतात,दरवर्षी प्रमाणे  या वर्षी देखील वाहतूक शाखेचे नियमन न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना थांबवून त्यांना रक्षाबंधन दिनानिमित्त सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे सांगण्यात आले. 

                 भाऊ बहिणीची रक्षा करण्याचे वचन  रक्षाबंधन दिवशी दिले जाते.सालाबादप्रमाणे क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन मार्फत हा सण साजरा करण्यात आला, त्याच बरोबर वाहतूक विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी हे देखील सणाच्या दिवशी सुट्टी न घेता आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना देखील या फाउंडेशनच्या सर्व महिलांनी  राखी बांधली.
        ह्या वेळी वाहतूक पोलीस निरीक्षक  संजय पाटील, तसेच पोलीस नाईक ज्ञानेश्वर पवार, पोलीस नाईक  प्रशांत भोईर, पोलीस शिपाई निलेश ठाकूर, महिला पोलीस  शिपाई बिराजदार, महिला पोलीस शिपाई तिबिले,खजिनदार स्नेहा धुमाळ, रसायनी  विभागीय अध्यक्ष  राधिका कोळी  सह समजसेविका रूपा सिन्हा तसेच इतर पत्रकार बंधू व सदस्य उपस्थित वाहनचालकांना  सुरक्षाराखी बांधून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे सांगून रक्षाबंधन साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण