राजिप शाळा वडगांव येथे भारतीय संस्कृतीचे दर्शन,शाळेच्या भिंती वर अभ्यास,विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : २० जुलै,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव ही अल्प अधिचच नाव रुपाला आली त्यांचे एक मेव कारण म्हणजे येथील असलेले मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या प्रयत्नाने या शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे.या शाळेमध्ये येणारे प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरी करण्यांची परंपरा या ठिकाणी जोपासली जात असल्यामुळे आज विद्यार्थ्यांनी काढलेली विठोबा - रखुमाई ची पायी दिंडी ही भारतीय संस्कृती जोपासली जात असल्यांचे पाहावयास मिळाले.
ही शाळा एक सुसज्य म्हणून मानली जात असून या मध्ये विद्यार्थ्यांस अभ्यास करण्यासाठी संगणक सुद्धा असून त्याच बरोबर, प्रत्येक खोली मध्ये एलईडी बसविण्यांत आली आहे.या ठिकाणी भाजीपाला लागवड आणि त्यांचे संवर्धन केले जाते.विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यांत आला.त्याच बरोबर कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते.वर्षभरामध्ये पन्नास किलो पर्यंत खत निर्माण केला जात असल्यांचे येथिल शिक्षकांनी सांगितले.
या शाळेमध्ये विविध बदल घडविण्यात तसेच अनेक उपक्रम राबविण्यांत मा.सरपंच एम.के. गडगे यांचा मोलाचा वाटा असल्याचे समजते.त्याच बरोबर या शाळेला पाहण्यासाठी अधिकारी वर्गांनी हजेरी लावली असल्याचे समजते.यामुळे ही शाळा पहाताच मनाला समाधान मिळत आहे.या शाळेच्या भिंती जणू या आभ्यासांनी रंगून गेले असून मध्ये आपणांस पहिली ते आठवी पर्यंत चा अभ्यास या भिंतीवर कोरण्यांत आला आहे.त्याच विविध वनस्पती आणी त्यांची फुले या ठिकाणी रंगविण्यांत आले आहे.
ही शाळा उत्तम अशी निर्माण व्हावी मुलांच्या मध्ये चांगले संस्कार घडावे यासाठी येथील शिक्षक ग्रामस्थ सहकार्य लाभत आहे.शाळेच्या हा चढता आलेखाला अनेकांचे सहकार्य लाभत असून आज या शाळेची पटसंख्या शंभर च्या पुढे गेली आहे.त्याच बरोबर खाजगी शाळेत शिक्षण घेणारी मुले आता जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्यामुळे शाळेचा पटसंख्या समवेत शाळेनी जिल्ह्यात आपले नाव उज्ज्वल केले आहे.यावेळी राजिप शाळा वडगाव चे मुख्याध्यापक सुभाष राठोड,पत्रकार प्रशांत गोपाळे, सरस्वती कवाद विषय शिक्षिका,वैजनाथ जाधव उप शिक्षक स्वयं सेविका निकिता गडगे,साक्षी जांभुळकर, भाग्यश्री तांबोळी, आकांक्षा जाधव,श्रुतिका जांभुळकर,वेदीका गडगेशाळा व्यवस्थापन समिती च्या शिल्पा जाधव,शुभदा दळवी, मानसी गडगे सदस्या , ह.भ.प.जनार्दन महाराज दळवी,ह.भ.प.रामदास महाराज जाधव,अनंता जाधव व मोठ्या संख्येने पालक,ग्रामस्थ , अदि या कार्यक्रमास उपस्थिती होते.
0 Comments