धनगर आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करा- मावळ तालुका धनगर समाजाची मागणी ....
चौंडी येथील उपोषणाला पाठींबा देत तहसीलदार यांना दिले निवेदन....
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २५ सप्टेंबर,
राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाला ( एसटी सर्टिफिकेट ) धनगर आरक्षनाची अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आक्रमक पवित्रा घेतला असून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुक्यात रस्ता रोको, धरणे आंदोलन करीत सरकारचा निषेध करीत आहेत, त्यातच आता मावळ तालुक्यातील धनगर समाजानेही आक्रमक पवित्रा घेत आज वडगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या २० दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे त्यांना जाहीर पाठींबा मावळ तालुका धनगर समाजाच्या वतीने देऊन धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीचे निवेदन मावळचे तहसीलदार यांना देण्यात आले, तर चौंडी येथे चालू असलेल्या उपोषणाची सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन धनगर समाजाला धनगर आरक्षनाची अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळात मावळ तालुक्यातील धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करील असा इशारा मावळ तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी भरत कोकरे, मावळ पंचायत समितीचे माजी सदस्य हरिष कोकरे, नामदेव शेडगे, रविंद्र कोकाटे, माजी सरपंच संजय कोकरे, रामभाऊ शेडगे, रामभाऊ कोकरे, शंकर ठिकडे, भाऊ शेडगे, लक्ष्मण मरगळे, धाऊ मरगळे, गणेश गोरे, पप्पू शेडगे, आनंद आखाडे, गंगाराम मरगळे, मारुती ठिकडे, राया जानकर,भीमा शिंगाडे, सनी खरात, विष्णू शेडगे ,आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments