मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवनेत महिला वर्गांचा पक्ष प्रवेश
पाताळगंगा न्यूज : संजय कदम
पनवेल : २५ सप्टेंबर,
शिवसेना महिला आघाडी पनवेल तालुका प्रमुख संध्याताई पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेना पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तसेच महिला जिल्हा प्रमुख कुंदा गोळे यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे जाहीर महिला पक्ष प्रवेश पार पडला,
पनवेल परिसरात होत असलेल्या जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या कर्तुत्वावर व सवेंदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत महिलांनी शिवबंधन बांधत भगवा हाती घेतला.यावेळी, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, शहर संघटीका ज्योती पाटिल शहर संघटक आनंदा माने व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी महिलांना संघटने चे महत्व सांगितले तसेच संघटित राहून महिलांचे प्रश्न सोडवावे असे ही सांगितले. तसेच महिलांसाठी महिला बचत गट व इतर सरकारी अनुदानासाठी देखील मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
0 Comments