जनुबाई ट्रस्ट अध्यक्ष मुकेश भंडारी यांच्याकडून जांभिवली शाळेस शैक्षणिक साहित्याचे वाटप

 जनुबाई ट्रस्ट  अध्यक्ष मुकेश भंडारी यांच्याकडून जांभिवली  शाळेस शैक्षणिक साहित्याचे वाटप



पाताळगंगा न्यूज ( दत्तात्रय शेडगे )
खालापूर : १० सप्टेंबर,


              खालापुर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली येथील  शाळेतील गरीब, गरजु व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
            शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थी बाहेर जाऊ नये त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता यावे. शाळेत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके मिळतातच परंतु इतर शैक्षणिक साहित्य पालकांना विकत घ्यावे लागते पण समाजातील काही आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना सदरचे साहित्य विकत घेताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. हीच भावना   ठेवून आज जनुबाई ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मुकेश भंडारी  व फोर्टी प्लस पाताळगंगा रसायनी गृप  यांच्या  वतीने शाळेतील व अंगणवाडी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व स्पोर्ट् ड्रेसचे वाटप करण्यात केले. 
            यावेळी  आण्णा गावडे यांनी बोलताना    विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन एक संस्कारीक नागरिक घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.  त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांना मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप, शशिकांत भांडारकर- अध्यक्ष फोर्टी प्लस खालापुर ,अरुण विशे- खजिनदार रसायनी ,टी.के.कुरगंळे,अध्यक्ष रसायनी , प्रकाश कुंभार,आण्णा गावडे,प्रेमी कृष्णा गावडे, उपसरपंच राजन गावडे, ओमकार गावडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप यांनी केले.

Post a Comment

0 Comments

दुर्गम भागामध्ये आरोग्य तपासणी एटीजी हेल्थ केअर सामाजिक संस्थे चा पुढाकार