सण-उत्सव,शांततेने शासनाच्या नियमाचे पालन करुन करा, खालापूर पोलीसांचा चौक येथिल ग्रामस्थांशी सुसंवाद
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : १ सप्टेंबर
हिंदु संस्कृतीत सण - उत्सवांना खूप महत्व असते.मात्र काही वेळा शासनांने नियम पायदळी तुडविले जात असते.मात्र तसे होता कामा नये,प्रत्येक नागरिकांनी कायदा ,सुव्यवस्था राखला पाहिजे.यासाठी खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी,विक्रम कदम,पोलीस निरीक्षक कुंभार,सपोनी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चौक येथिल ग्रामस्थांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी येणारे सण उत्सव है कसे साजरे कराल यासाठी गावभेट घेवून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी दहिहंडी पथक, ईद ए मिलाद, गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. ग्रामस्थांशी चर्चा करून उत्सव कार्यक्रमाची परवानगी घ्यावी, ध्वनीप्रदुषण अधिनियमांचे पालन करावे, मंडप उभारणी, मुर्ती सुरक्षा उपाययोजना, धार्मिक,जातीय तेढ निर्माण होणारे आक्षेपार्ह मजकुर, बॅनर, संदेश प्रसारित करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये, मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह बिभत्स गाणी लावु नये, वक्तव्य करू नये. मिरवणुकीचे वेळी,दर्शनाचे ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड , विनयभंग यासारखे प्रकार होणार नाही याची दक्षता घेवुन महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या असे मार्गदर्शन करण्यात आले.
त्याच बरोबर सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवावे, विसर्जन स्थळाची सुरक्षा तसेच गावामध्ये शांतता राखुन गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, तसेच गोविंदापथक, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक, शांतता मोहल्ला कमिटीचे सदस्य, यांचेसह चौक ग्रामस्थ उपस्थित होते. चौक या बाजारपेठेतील विसर्जन मार्गांची पाहणी करून धावरी नदी विसर्जन ठिकाणी भेट देण्यात आली.
0 Comments