अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश तसेच दप्तरांचे वाटप

 माजी उपसरपंच सदानंद मोरे यांच्या प्रयत्नाला यश,हुतामाकी कंपनीकडून विद्यार्थी गणवेश व दप्तरांचे वाटप)

अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश तसेच दप्तरांचे वाटप



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे 
खोपोली/वावोशी : १३ डिसेंबर 


            राजकीय जीवनात काम करतांना अनेक आरोप प्रत्यारोपांना सामोरे जावे लागते मात्र लोकांच्या खोट्यानाट्या आरोपांना भिक न घालवता आपण हाती घेतलेला सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ वृत्तीने काम करण्याची परंपरा चालू ठेवण्याचे काम शिरवली ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच सदानंद मोरे यांनी चालू ठेवल्याचे पहायला मिळत आहे.उपसरपंच म्हणून काम करतांना सदानंद मोरे यांनी हुतामाकी कंपनीकडून ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश तसेच दप्तरांचे वाटप करण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी केली होती.
                  या मागणीला अखेर यश मिळाले असून काल एका छोटेखानी कार्यक्रमाच्या आयोजनातून हुतामाकी कंपनीकडून उचाट रानसई गावातील अंगणवाडी तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तरांचे वाटप करण्यात आले.यावेळी कंपनीचे व्यवस्थापक श्रीधन महाजन,हिमांशु खेडेकर,सुरज वैशंपायन,दीपक कानेटकर,कैलास पाटील, ग्राम पंचायत सदस्य संदीप मनोहर मोरे,शिरवली ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच सदानंद मोरे,प्रभाकर मोरे, रविंद्र मोरे तसेच ग्रामस्थ उचाट रानसई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                कार्यक्रमाची प्रस्तावना प्रभाकर मोरे यांनी करतांना शाळेची माहिती व या शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुरूजनांचे कौतुक केले.यावेळी कंपनीचे व्यवस्थापक श्रीधन महाजन,
हिमांशु खेडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात आपणही प्राथमिक शाळेचे विद्यार्थी होतो असे सांगून आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.मुलांच्या शिक्षणासाठी काही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगून पर्यावरणावर कसं नियंत्रण ठेवायचे यांचा विचार आपण सर्वांनी करणे काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले.
                    कंपनीकडून या विद्यार्थ्यांना आणखीन काही देता येईल याचा प्रयत्न आम्ही कंपनीच्या संचालक मंडळाशी बोलून करणारच असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.मुलांना चांगला अभ्यास करून उत्तम प्रगती केली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले. मुलांना गणवेश आणि दफ्तर मिल्यामुळे मुले खूप खुश होती.कार्यक्रमाच्या शेवटी आभार शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर