महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ लोकसभा मतदार संघ आढावा बैठक खोपोली येथे संपन्न

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ लोकसभा मतदार संघ आढावा बैठक खोपोली येथे संपन्न 





पाताळगंगा न्यूज ( दीपक जगताप )
खालापूर : १६ सप्टेंबर,

           आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज खालापूर तालुका मनसेच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक खोपोली येथे पार पडली .ह्या वेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस अमेय खोपकर यांनी मावळ लोकसभा निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन केले आहे. 
                यावेळी अमेय खोपकर महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, रणजित शिरोळे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, सचिन चिखले ,नगरसेवक पिंपरी चिंचवड, जितेंद्र पाटील जिल्हाअध्यक्ष, जे पी पाटील,मनीष खवले,विजय सावंत खालापूर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,सपना राऊत जिल्हा अध्यक्ष महिला,सचिन कर्नुक,हेमलता चिंबुलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न