परखंदे प्राथमिक शाळेत रक्षाबंधनासह शिक्षक दिन उत्साहात साजरा,विद्यार्थ्यांना वह्या,पेन,खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

 परखंदे प्राथमिक शाळेत रक्षाबंधनासह शिक्षक दिन उत्साहात साजरा,विद्यार्थ्यांना वह्या,पेन,खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न




हनुमंत मोरे  (पाताळगंगा न्यूज )
खोपोली/ वावोशी : ६ सप्टेंबर,
                      
                 शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी शहर तालुका संघटक तथा भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या खालापूर तालुका अध्यक्ष आसावरी घोसाळकर यांनी परखंदे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला,सोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परखंदे शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्यांचे ही वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पहायला मिळाला.


                शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून गेले अनेक दिवस तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.शिवसेननेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचा मागील महिन्यात वाढदिवस होता मात्र तालुक्यातील इर्शाळवाडीवर कोसळलेल्या आस्मानी संकटामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम करण्यास मनाई केली होती.मात्र या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या पूर्व तयारी नुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून वह्या खरेदी करण्यात आल्या होत्या या वह्या महिला आघाडी शहर तालुका संघटक तथा भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या खालापूर तालुका अध्यक्ष आसावरी घोसाळकर यांनी परखंदे येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून दिल्या होत्या मात्र या वह्या वाटपाला मुहुर्त सापडत नव्हता अखेर काल शिक्षकदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.सोबत आसावरी घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या राख्या व पेन विद्यार्थ्यांना भेट देत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
 ‌               


                  शिक्षकांचा सत्कार 
परखंदे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ४७ असून येथे बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी समाज बांधवाची मुले आहेत.याहीपेक्षा सर्वात महत्वाची बाब म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांची दैनंदिन हजेरी ही शंभर टक्के लागत असल्याने शिक्षकांचे कौतुक केले जात असते.येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटप व रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करतांना शिक्षकदिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी परखंदे शाळेचे मुख्याध्यापक बंडगर सर यांचा शाळा,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

            या कार्यक्रमासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी शहर तालुका संघटक तथा भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या खालापूर तालुका अध्यक्ष आसावरी घोसाळकर,युवा सेना खालापूर तालुका अधिकारी महेश पाटील, होराळे ग्राम पंचायतीचे उपसरपंच गणेश मोरे, पत्रकार हनुमंत मोरे, मिलिंद मोरे,हेमंत पाटील,अमित मोरे, दिनेश पाटील,आशा पाटील (माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ), सारिका पाटील (शा. व्य. स. उपाध्यक्ष )सुवर्णाताई मोरे, सानिका पाटील, लता पाटील (सदस्य )ललिता जाधव (ग्रा. सदस्य), सविता पाटील( सदस्य ),नेहा पाटील (माजी विद्यार्थिनी) आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,