संकेत ठोंबरे यांचा राधिका दुध डेअरीला ग्राहकांची पसंती

 संकेत ठोंबरे यांचा राधिका दुध डेअरीला  ग्राहकांची पसंती 







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
शिद्धेश्वरी : १६ सप्टेंबर,

                        गणरायांचे आगमनासाठी काही कालाचा अवधि असतांना आसरोटी येथिल असलेले नवतरुण यांनी यांचा दुधाचा व्यवसाय असून या मध्ये पाताळगंगा परिसरात नव्याने राधिका दूध डेअरी सुरु केल्यामुळे उत्तम प्रकारचे दुध,दही,पनीर,तुप तसेच दुधापासून बनविले पदार्थ मिळत असल्यामुळे ग्राहकांची मोठ्याप्रमाणावर पसंती होत असून खरेदि साठी मोठी गर्दि होत असल्यांचे पहावयास मिळत आहे.शिवाय घरी असलेल्या म्हशी पासून दुध काढून विकत असल्यामुळे या मध्ये भेसळ नसल्याने ग्राहक आवर्जून खरेदि करीत आहे.

               आज दुकानामध्ये आपल्याला हवे त्या वस्तू मिळत असतात.मात्र आपण शंभर टक्के शुद्ध आहे असे आपण सांगू शकत नाही.शिवाय पाउच मध्ये  येणारे दुध अन्य वस्तू प्रत्येकजण खरेदि करतो असे नाही.मात्र गावरान म्हशीचे सर्वच पदार्थ प्रत्येक जण खरेदि करीत असतो.गेले अनेक वर्षापासून दुध व्यवसाय करीत आहे.आजचे तरुण वर्ग नोकरी मध्ये सर्वस्व मानत असतात.मात्र संकेत ठोंबरे यांनी वडीलांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष या व्यवसायात स्वताला झोकून दिले आहे.
            नुकताच त्यांच्या या शिद्धेश्वरी या राधिका डेअरी यांचे अनावरण आपल्या वडील वासुदेव ठोंबरे यांच्या हस्ते या डेअरी चे अनावरण करण्यात आले.यावेळी या परिसरातील सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आश्या विविध मान्यवरांनी या ठिकाणी भेट देवून त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.एक मराठी तरुणांनी  व्यवसायात स्वताला झोकून दिले यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे. असे मत आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न