खोपोलीतील प्रभाग क्र.६ मधील गणपती विसर्जन घाटाचा चेहरामोहरा बदला,

 खोपोलीतील प्रभाग क्र.६  मधील गणपती विसर्जन घाटाचा चेहरामोहरा बदला,


माजी नगरसेविका मामी शेलार व युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सोनू शेलार यांच्या पाठपुराव्याला यश



पाताळगंगा न्यूज :  समाधान दिसले
खालापूर : १९ सप्टेंबर,
   
           खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ६  मधील प्रलंबित कामे मार्गी लागावी आणि या प्रभागाचा कायापालट  व्हावा या हेतूने स्थानिक माजी नगरसेविका मामी शेलार व युवासेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सोनू शेलार हे आमदार महेंद्रशेठ थोरवे याच्याकडे पाठपुरावा असल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अनेक प्रलंबित कामे मार्गी लागली असता यातील प्रामुख्याने गणपती विसर्जन घाट विकसीत करणे काम मार्गी लागल्याने नगरसेविका मामी शेलार व जिल्हा संपर्कप्रमुख सोनू शेलार यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
             तर प्रभाग क्रमांक ६ मधील गणपती विसर्जन घाटाचे रूप बदलल्याने गणेशोत्सवात गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना मोठा लाभ होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
           

  खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मधील गणपती विसर्जन घाटाच्या विकसनचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, तर हे काम मार्गी लागावी यासाठी स्थानिक नगरसेविका मामी शेलार व युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सोनू शेलार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून या घाटाच्या विकसन करता निधी प्राप्त झाल्याने या घाटाचे अनेक वर्षाचे प्रलंबित काम मार्गी लागल्याने आमदार महेंद्र थोरवे सह खोपोलीच्या नगरसेविका मामी शेलार व युवानेते सोनू शेलार यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. तर या गणपती विसर्जन घाटाचा चेहरा मोहरा बदलल्याने गणपती विसर्जन करता येणाऱ्या भाविक भक्तांना मोठा लाभ मिळणार आहे .
              याबाबत युवासेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सोनू शेलार यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, प्रभाग क्रमांक सहा मधील गणपती विसर्जन घाटाचे प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्याने मनाला वेगळे समाधान मिळत असून या गणपती विसर्जन घाटाचं चेहरा मोहरा

बदलण्यासाठी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी निधी दिल्याने त्यांचे मनापासून आभार व कौतुक खोपोलीकरांच्या वतीने करीत असून प्रभाग क्रमांक सहा मधील अन्य प्रलंबित कामे लवकरच आमदार साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लागणार आहेत, असे सोनू शेलार यांनी मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान