माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!

 माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!

माय मराठी न्युज  : वृत्तसेवा 
माजगाव : १६ नोव्हेंबर ,

               ग्रुप ग्रामपंचायत  हद्दीतील असलेले माजगाव स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा खड्यातून जात असल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैर सोय होत होती.ग्रामस्थांना खड्यातून प्रवास करावा लागत होता.पावसाळ्यात अक्षरशा: तारांबळ उडत असल्यामुळे या ठिकाणी रस्ता होणे गरजेचे असल्यामुळे सरपंच दिपाली नरेश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी, क्रॉक्रीटिकरण करण्यात आल्याने येथिल ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे.हा रस्ता पंचायत समिती सेझ फंडातून करण्यांत आल्यामुळे गेली अनेक वर्ष खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम! मिळाला आहे.
               .सरपंच दिपाली नरेश पाटील ह्या सत्तेत आल्यापासून अनेक समस्यावर उपाय योजना करुन ते काम मार्गी लावले आहे. पाताळगंगा नदीच्या किनारी लगत असलेली ही स्मशान भूमीकडे जातांना एक ते दीड पायी प्रवास करावा लागत होता.त्याच बरोबर स्मशान भूमी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे या भूमीपर्यंत जाताना मोठी कसरत करावी लागत होती.या ठिकाणी हा रस्ता क्रॉक्रीटिकरण झाल्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे.
         या परिसरातील निर्माण होत असलेल्या समस्या अथवा गेली अनेक वर्ष दुर्लक्षित असलेली कामे करण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जाते.सरपंच दिपाली नरेश पाटील या स्वतः ह्या ठिकाणी उभे राहून हे काम पूर्ण केले यावेळी, ग्रामसेवक संदीप धारणे, माजी उपसरपंच अपर्णा यशवंत शिंदे तसेच सर्व सदस्य यांचे मोलाचे योगदानातू हे काम यशस्वी रित्या पूर्ण झाल्यामुळें ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहे.

Post a Comment

0 Comments

माजगावच्या स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता झाला सुखमय,अनेक वर्षाचा खड्डेमय प्रवासाला पुर्ण विराम!