खालापुरात सकळ मराठा समाजाचे राज्य सरकार विरोधात आंदोलन ,तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

 खालापुरात सकळ मराठा समाजाचे राज्य सरकार विरोधात आंदोलन ,तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा 




दीपक जगताप : ( पाताळगंगा न्यूज )
खालापूर : २ सप्टेंबर

         जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करत असलेल्या मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्ज निषेध म्हणून सकल मराठा समाज खालापूर च्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.जालन्यातील आंदोलन शांततेत सुरू असताना आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला मनोज जरांगे पाटील व इतर कार्यकर्ते उपोषण करताना त्यांच्यावर झालेल्या लाठीमारात लहान मुले, वयोवृद्ध , महिला देखील जखमी झाल्याने मराठा  समाजात संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी शासनाविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.  
                   शनिवारी खालापुरात सकल मराठा समाज नगरपंचायत कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर एकवटला होता. 
राज्य सरकारच्या  निषेधाच्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर चालून गेला. तहसील कार्यालयात मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा सकल मराठा समाजाचे नेते सुनील पाटील एकनाथ पिंगळे 
            तसेच नरेश पाटील ,विजय सावंत, नितीन पाटील, उत्तम भोईर,राजु गायकवाड, रमेश पाटील,सुरेश कडवे,प्रशांत खांडेकर,दिनेश महाडिक,एस एम पाटील,सुहास कदम,महेश पाटील,सचिन कर्णक,संभाजी पाटील,अशोक मरागजे,मंगेश कदम,सुमित सावंत, अमित पाटील,सौरभ पाटील,रोशन पाटील,मोहन घाडगे, निलेश शिंदे,संदीप मोरे,तानाजी जाधव,पंकज जाधव,दिनेश महाडिक,मनोहर देशमुख ,ऊमेश गावंड, उमेश पडवकर ,शैलेश भोसले,मंदा भोसले, धनश्री दिवाणे,अदिती पवार, सुखदा बने कविता पाटील, अरुणा सुर्यवंशी यांच्यासह तालुक्यातील मराठा समाजातील महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन