कार्यक्रमाची रितसर परवानगी घेवून,ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे पालन करावे....विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी

 कार्यक्रमाची रितसर परवानगी घेवून,ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे पालन करावे....विक्रम कदम उपविभागीय पोलीस अधिकारी 



हनुमंत मोरे (,पाताळगंगा न्यूज )
वावोशी / खोपोली २ सप्टेंबर 
             
              आगामी काळात येणाऱ्या गोपाळकाला, गणेशोत्सव, ईद ए मिलाद आदी सणांच्या अनुषंगाने खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी आपल्या कार्यक्षेत्रात चौक दुरक्षेत्राच्या कक्षेतील नागरिकांना मार्गदर्शन केले.आगामी काळात अनेक सण,उत्सव येत असून हे सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करा परंतु यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तसेच ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे पालन करावे, त्यामुळे आपल्या आनंदाचा त्रास अन्य लोकांना होणार नाही आणि आपल्याला आनंदाने सण,उत्सव साजरा केल्याचा आनंद उपभोगता येईल Agar मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले.
              विक्रम कदम यांनी गावभेटी दरम्यान दहिहंडी पथक, गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थांची बैठक घेतली. उपस्थितांशी चर्चा करून त्यांना उत्सव कार्यक्रमाची परवानगी घ्यावी, ध्वनीप्रदुषण अधिनियमांचे पालन करावे, मंडप उभारणी, मुर्ती सुरक्षा उपाययोजना, धार्मिक,जातीय तेढ निर्माण होणारे आक्षेपार्ह मजकुर,बॅनर,संदेश प्रसारित करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये,मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह बिभत्स गाणी लावु नये,वक्तव्य करू नये. 
               मिरवणुकीचे वेळी तसेच दर्शनाचे ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड,विनयभंग यासारखे प्रकार होणार नाही याची दक्षता घेवुन महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम राबवावे, विसर्जन स्थळाची सुरक्षा तसेच गावामध्ये शांतता राखुन गणेशोत्सव साजरा करणेबाबत योग्य त्या सुचना दिल्या व मार्गदर्शन केले. सदरवेळी गोविंदापथक, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक, शांतता मोहल्ला कमिटीचे सदस्य, यांचेसह चौक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच चौक बाजारपेठेतील विसर्जन मार्गांची पाहणी करून धावरी नदी विसर्जन ठिकाणी भेट दिली.यावेळी त्यांचे समवेत खालापूरचे पोलिस निरीक्षक बाळा कुंभार,सपोनी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन