सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांचा बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात विशेष सत्कार
पाताळगंगा न्यूज : संजय कदम
पनवेल : २९ सप्टेंबर,
पारगाव-दापोली व परिसरातील स्थानिक प्रश्नावरून सिडकोविरोधात लढा देणारे सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक यांचे पती बाळाराम नाईक यांचा विशेष सत्कार कळंबोली बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सवाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
बाळाराम नाईक यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या कार्याची दखल ळंबोली बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सवाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी पनवेल महानगर शहर विभागाचे तालुका प्रमुख भरत जाधव, उपसरपंच मनोज दळवी यांच्यासह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments