प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



पाताळगंगा न्यूज ( संजय कदम )
पनवेल : १८ सप्टेंबर, 

             रायगड जिल्हा परिषद शाळा वडघर उर्दू येथे प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आयु.कुणाल लोंढे (पोलीस पाटील करंजाडे) प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे सचिव-   आयु.ॲड.अमित कांबळे ,  आयु.नितीन म्हस्के , आयु.दिगंबर साळवी, आयु. महादेव कांबळे , आयु.विजय कदम, सदस्य  तसेच आयु.असलम कल्याणकर उपस्थित होते.
                     या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना वह्या व रंगीत पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापक श्रीम.तस्नीम मुल्ला  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळून त्यांना शिक्षण घेण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांच्या वतीने प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे यांचे हार्दिक आभार व्यक्त केले. 

Post a Comment

0 Comments

उरण मध्ये कॉग्रेसच्या महेंद्र घरत आणि आमदार महेश बालदी यांच्यात होणार काटे की टक्कर...