धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, हर हर चांगभले धनगर समाज संस्थेची मागणी, नायब तहसीलदार यांना दिले निवेदन.

 धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा, हर हर चांगभले धनगर समाज संस्थेची मागणी, नायब तहसीलदार यांना दिले निवेदन.

     

पाताळगंगा न्यूज ( दतात्रय शेडगे )
खालापूर : १८ सप्टेंबर 


              राज्यात मराठा आरक्षना  पाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षनासाठी रस्त्यावर उतरला  धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आज हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांनी खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन दिले आहे.
                तर चौंडी येथे ६ सप्टेंबर पासून यशवंत सेनेने  आमरण  उपोषण  सुरू केले असून या आमरण उपोषणाला हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांनी जाहीर  पाठींबा देऊन नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे,राज्यात गेल्या ७०  वर्षापासून होत असलेली धनगर आरक्षणाची मागणी कुठल्याच राज्यकर्त्यांनी मान्य केली नसून आजपर्यंत धनगर समाजाच्या  धनगर आरक्षण अंमलबजावणी अजूनही झाली नाही,या मागणीसाठी राज्यातून अनेक धनगर समाजाने मोर्चे, रस्ते आंदोलन करीत आहे.
            तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी जी अहमदनगर येथे यशवंत सेनेचे पदाधिकारी आणि समाज बांधवानी ६ सप्टेंबर  पासून  आमरण उपोषण सुरू केले आहे, या उपोषणाला  आज १२  वा दिवस  चालू असून उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली आहे, तरीही सरकारने गांभीर्याने घेतले नाही सरकारने जर या  आंदोलनाची दखल घेतली नाही तर  खालापुरात धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा  हर हर चांगभले धनगर समाज संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.
                  तर अहमद नगर जिल्ह्याचे पालकमंत्री   राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर समाज बांधव शेखर बंगाले यांनी भंडारा उधळला त्यावेळीं त्यांनाही विखे यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली याचाही निषेध या निवेदनात नोंदविण्यात आला आहे.तर सरकारने चौंडी येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाला भेट देऊन यशवंत सेनेची  मागणी मान्य करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आज निवेदनात केली आहे, यावेळी हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे खालापूर तालुका अध्यक्ष हरेश ढेबे, उपाध्यक्ष ठकुराम  झोरे सचिव चंद्रकांत हिरवे,खजिनदार  दत्ता हिरवे, जनार्धन गोरे आदी सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

उरण मध्ये कॉग्रेसच्या महेंद्र घरत आणि आमदार महेश बालदी यांच्यात होणार काटे की टक्कर...