मितेश जाधव यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत राजिप शाळा सारसई शैक्षणिक साहित्य वाटप

 मितेश जाधव यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत राजिप शाळा सारसई शैक्षणिक साहित्य वाटप 




पाताळगंगा न्यूज ( राम ढेबे )
आपटा : १३ सप्टेंबर,

         आज वाढदिवस साजरा करण्यांचे विविध क्रेज समाज्यामध्ये  निर्माण झाले.असून मात्र आजही काही तरुण वर्ग आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरे केले जात असते.आपटा गावचे असलेले युवक  मितेश जाधव यांनी आपला वाढदिवस रायगड जिल्हा परिषद शाळा बागेचीवाडी या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या ७५ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
               बागेचीवाडी शाळा ही दुर्गम भागात असून या शाळेत ७५ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा दुर्गम भागात असल्यामुळे येथील मुलांना शिक्षणाची व शैक्षणिक साहित्याची  कमतरता भासू नये यासाठी शाळा व्यावस्थापण समितीचे अध्यक्ष संतोष शिंगाडे, हे प्रयत्न करीत असतात. मितेश गेल्या ३ वर्षां पासून आपला वाढदिवस कोणत्याही हॉटेल किंवा फार्महाउस येथे साजरा न करता तो आपला वाढदिवस अतिशय साध्या पदधतीने  शाळेत शिक्षण घेत असलेल्या गरीब गरजू मुलांना सोबत साजरा करीत असल्यांचे पहावयास मिळत आहे.
            यावेळी  ग्रामस्थांशी व मुलांशी संवाद साधत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,मातृसेवा फाउंडेशनचे सदस्य संतोष शिंगाडे यांनी  वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत साजरे झाल्यास यांचा उपयोग समाजासह ग्रामीण भागातील मुलांना याची मदत होईल अस मत यावेळी त्यांनी वक्त केले 
               यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून  किरण चव्हाण शिना शहाजी  शालेय मुख्यद्यापिका वंदना नरळे शिक्षण राजेश भोऊड, शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शिंगाडे , शालेय माजी विद्यार्थी राम ढेबे कृष्णा वाघे दामू वाघे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश