किल्ले रायगड देखाव्याला सर्व प्रथम क्रमांक
पाताळगंगा न्यूज : कृष्णा भोसले
तळा : २६ सप्टेंबर,
खैराट ग्रामस्थ मंडळ व खैराट मूंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व नवतरुणांच्या संकल्पनेतून यावर्षी प्रथमच "गणपती सजावट स्पर्धा "........ २०२३ साली आयोजित करण्यात आली. या झालेल्या गणपती सजावटीच्या स्पर्धेत १३ गणेश भक्तांनी भाग घेतला यामध्ये प्रथम क्रमांक गोविंद नारायण भोईर (किल्ले रायगड देखावा), द्वितीय क्रमांक प्रकाश दामोदर आडखळे (गड जेजुरी), आणि तृतीय क्रमांक अनंत नारायण नाडकर (चंद्रयान-३) यांना मिळाला.
गोविंदशेठ भोईर ,नथुराम भोईर ( अध्यक्ष मुंबई मंडळ) राम नाडकर, अनंतशेठ नाडकर , संतोष भोईर, तुकाराम नाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
सजावट साहित्य तयार असलेले बाजारातून विकत न घेता आपल्या घरातील नैसर्गिक पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून कमीत कमी खर्चात निर्माण करुन आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन घडावे या दुहेरी उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविल्या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून, किल्ले रायगडचा देखावा हा महाराजांचे गड "किल्ले संवर्धन" करण्याच्या संकल्पनेतून प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने साकार करण्यात आला होता .
0 Comments