शितल सहदेव गोळे यांना राष्ट्रस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

 शितल सहदेव गोळे यांना राष्ट्रस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान 




पाताळगंगा न्यूज ( दीपक जगताप  )
खालापूर : २७ सप्टेंबर,

                  आविष्कार सोशल ॲंड एज्युकेशन फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या माध्यमातून  विविध क्षेत्रात उत्तम असे काम करून आपल्या कामाचा ठसा उमठवलेल्या या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रस्तरिय पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार शितल स.गोळे शाळा -तोंडरे, तालुका- पनवेल, रायगड यांना सन्मान चिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. 
                सन २०२३  या वर्षासाठी हा कार्यक्रम ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह महाड येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित हा पुरस्कार देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांची पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
                 शितल  गोळे यांची एकूण सेवा २१  वर्षे झाली.असून या आधी त्यांनी अनेक नामवंत संस्थांमध्ये अध्यापनाचे काम केले आहे.शाळेत पुस्तकी ज्ञानासोबत संस्कारांचे धडे दिले जात असतांना, माणूस म्हणून कसे जगावे? आपले जीवन फक्त आपल्यासाठीच नाही, जेवढे शक्य होईल तेवढं आपण समाजकार्य केले पाहिजे.
 आपला पेशा हा पवित्र पेशा आहे, मोलाचं काम आणि भावी पिढी घडविण्याचे काम आपल्या हातून होत आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर