भारत राष्ट्र समिती, पनवेल तर्फे अनंत चतूर्थी निमित्ताने, नविन पनवेल येथे गणेश भक्तांसाठी पिण्याचे पाणी वाटप
पाताळगंगा न्यूज : संजय कदम
पनवेल : २९ सप्टेंबर,
पनवेल शहराच्या मध्यवर्ती भागात अदई तलाव येथे गणपती विसर्जना साठी येणारे लाखो भाविक व विविध गणेशोत्सव मंडळे यांची पिण्याच्या पाण्यासाठी दर वर्षी होणारी गैरसोय होत असल्यांचे निदर्शनास येताच भारत राष्ट्र समिती, च्या माध्यमातून या ठिकाणी पिण्यांचे पाण्यांचे पाउच वाटप करण्यात आले.
भारत राष्ट्र समितीच्या काही कार्यकर्त्यांच्या गणपती विसर्जनांस भाविकांस येत असतात.मात्र त्यांस तहान लागल्यास पाणी उपलब्ध असेल असे नाही. ही बाब लक्षात येताच त्यानी भारत राष्ट्र समिती पनवेल महानगर सन्मयक व पनवेल विधान सभा उप - सन्मयक, प्राध्यापक प्रफुल पंडीत भोसले व ॲडव्होकेट नीलमताई प्रफुल भोसले यांच्या निदर्शनास आणुन दिली.भोसले दांपत्य यांनी त्वरित या उपक्रमास होकार दर्शीवीला. दर वर्षी गणपती विसर्जना साठी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय नको म्हणून एक चांगला उपक्रम राबवण्यात आला.
विविध गणेशोत्सव मंडळे व आलेल्या भाविकांनी या उपक्रमाचे उत्फुर्थ पणे स्वागत केले. या पुर्वी असा सामजिक उपक्रम पनवेल मध्ये कोणिही केला नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नागरिकांचा प्रतिसाद पहाता पनवेल मध्ये अबकी बार किसान सरकार असे बोलने वावगे ठरणार नाही
0 Comments