आरपीआय पक्षाचा चिपळूणला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

 आरपीआय पक्षाचा चिपळूणला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांचे अवाहन
 

हनुमंत मोरे : ( पाताळगंगा न्यूज )
वावोशी / खोपोली : २ सप्टेंबर

                 कोकणात पक्ष संघटना बांधणीसाठी कोकण प्रदेश कार्यकर्ता मेळावा चिपळूण येथे रविवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न होणार आहे.या शिबीरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय ना.रामदासजी आठवले उपस्थितांना संबोधित करणार आहेत.आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी केले आहे.                                  अन्यायाविरोधातील लढ्यात आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून बहुसंख्य भिमसैनिकांनी डरकाळी फोडून  आंदोलने केली आहे.पुन्हा एकदा आरपीआय पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रभर बैठका सुरू आहेत. आरपीआय पक्षाच्या छावण्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोकणात पक्षसंघटना मजबूतीने बांधण्यासाठी कोकण प्रदेश कार्यकर्ता मेळावा चिपळूण येथे आयोजित केला मेळाव्याचे उद्घाटन रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे.
           तर प्रमुख मार्गदर्शन ना.रामदासजी आठवले करणार आहेत तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे,महाराष्ट्र राज्य प्रदेश युवाअध्यक्ष पपूजी कागदे,मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संदेशजी मोहिते यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन