पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या, शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या, शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट




पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : ७ सप्टेंबर,

             तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी वळवली येथील  आदिवासी बांधव कसत असलेल्या जमिनी वर सिडकोने हक्क सांगून आदिवासी शेतकऱ्यांना बेघर केले आहे. त्या जमिनीवर आमची घरे आहेत, तसेच शेती ती नियमिंत  करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
                मंत्रालयात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वळवली येथील सर्व्हे क्र.४९/०, खाते क्र.११२ मधील ४७.४४ हेक्टर शासकीय जमीन आदिवासी बांधव पूर्वजांपासून कसत आहेत. गावातील आदिवासी बांधवांचे हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या जमिनीवरील घरे, तसेच शेती नियमानुकुल करण्याचे आदेश महसूल विभागाने यापूर्वी काढले आहेत. 
               वळवली गाव सिडकोच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने महसूल विभागाने सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव सिडकोमार्फत अंतिम मंजूरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंतिम मंजूरीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा केली.

Post a Comment

0 Comments

 रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन