सेंट मेरी स्कुल खरसुंडी फी वाढीव बाबत युवासेना कॉलेज कक्ष आक्रमक,गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाला दिले निवेदन

 सेंट मेरी स्कुल खरसुंडी फी वाढीव बाबत युवासेना कॉलेज कक्ष आक्रमक,गटविकास अधिकारी व शिक्षण विभागाला दिले निवेदन



पाताळगंगा न्युज :  समाधान दिसले
खालापूर : १० एप्रिल,

        खालापुर तालुक्यातील ग्रामीण भागामधील खरसुंडी येथे असलेली सेंट मेरी इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये अतिरिक्त वाढवलेल्या ३० ते ४०  टक्के फी मुळे मागील एक आठवड्यापासून पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविण्यांचा निर्णय घेतला आहे.तर या वर्षात अचानक भरमसाठ फी वाढल्यामुळे पालकांचे अर्थिक बजेट कोलमडले असून जोपर्यंत फी कमी होत नाही तो पर्यंत शाळेत न पाठविण्यांचा निर्णय पालकांनी घेतला. मात्र शाळा व्यवस्थापक यांचा मनमानी कारभारामुळे पालकांनी आपल्या व्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडली असता युवासेना कॉलेज कक्ष आक्रमक होत खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना व शिक्षण विभागाला फी कमी करण्यासाठी निवेदन देत लवकरात लवकर फी कमी करावी अशी मागणी केली आहे, तसेच जर शाळा व्यवस्थापनाने फी कमी न केल्यास ठाकरे गट युवा स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या कॉलेज कक्षचे तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी यावेळी दिला आहे.
              यावेळी युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड, उपअधिकारी धर्मेंश परमार, खालापूर तालुका अधिकारी प्रतिक मोरेश्वर शिंदे, खोपोली शहर अधिकारी जय निवृत्ती खेडकर, रायगड जिल्हा सक्रीय सदस्य हरेश कराळे, कर्जत शहर सहसंपर्कप्रमुख विनोद पांडे, युवती सेना तालुका संपर्कप्रमुख रिया मालुसरे, विभाग प्रमुख शरद घोडविंदे, विभागप्रमुख किशन चौहान, वैभव दळवी, एकनाथ कोळंबे आदी प्रमुखांसह पालक मच्छिंद्र पोलेकर, संतोष नलावडे, हेमंत चव्हान, दृष्टी गुजर, नितीन पाटील, दीपक पाटील, जितेंद्र बोदार्डे, महेश पाटील, गोपीचंद तुपे, अश्विनी बोदार्डे हे उपस्थित होते.
            खरसुंडी येथील सेंट मेरी इंग्लीश मेडीयम स्कुल ही सीबीएससी बोर्डाच्या नावाखाली शाळा सुरू झाल्याने या शाळेत ग्रामीण भागातील पालक वर्गाने आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे म्हणून या शाळेत दाखल केले,शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत करीत आहे.या संदर्भात गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत ती वाढीव फी कमी करा अशी निवेदनातून मागणी केली आहे. तर प्रशासनानं याचे गांभीर्य न घेतल्यास ठाकरे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला. तर इयत्ता ७  वीची फी १३  हजाराहून २३ हजार वर पोहचल्याने पालकांच्या पायाखालची वाळू शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाने सरकल्याचे लागल्याचे पाहायला मिळाले असून याबाबत पालक वर्ग आक्रमक झालेत.
              यावेळी युवासेना कॉलेज कक्ष तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की,सेंट मेरी या शाळेत यावर्षी अतिरिक्त फी अचानक वाढ करून पालकांची आर्थिक लूट शाळा व्यवस्थापन करत असल्याने ही लूट थांबावी यासाठी आम्ही गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे जर त्यांनी आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास काही दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, व आंदोलनाच्या काळात आजच्या संहिता लागू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर