धनगर आरक्षण मोर्च्यात लाखोंच्या संख्येने सामील व्हा- ऑल इंडिया धनगर महासंघाचे आवाहन
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २८ सप्टेंबर,
धनगर समाजाला (एसटीचे सर्टिफिकेट )धनगर आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने धनगर समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन केले आहे, हा मोर्चा ३ आक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केला आहे, तरी या मोर्चाला रायगड जिल्ह्यातून समाज बांधव, महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ऑल इंडिया धनगर महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे आणि जोतिलिंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुबंई अध्यक्ष रामचंद्र पुकळे यांनी केले आहे,
राज्यात गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाचा प्रत्येक राजकीय पक्षांनी फक्त मतांपुरता वापर केला असून आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण केली नाही, गेल्या अनेक वर्षे या मागणीसाठी धनगर समाजाला संघर्ष करावा लागत असून आता थेट उठ धनगरा जागा हो ...आरक्षणाचा धागा हो ....हे ब्रीद वाक्य घेऊन समाज रस्त्यावर उतरला आहे,
या मागणीसाठी यशवंत सेना यांच्या वतीने चौंडी येथे २१ दिवसापासून बेमुदत आमरण उपोषण चालू आहे मात्र त्यांची २१ व्या दिवसानंतर सरकारच्या लेखी आश्वासनंतर उपोषण मागे घेतले आहे तर काही ठिकाणी दररोज मोर्चे, चक्काजाम आंदोलन करीत आहेत त्यांना पाठींबा देऊन धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून संघटना, संस्था गट तट, बाजूला ठेवून धडक मोर्च्याचे आयोजन केले आहे या मोर्चात रायगड जिल्ह्यातून समाज बांधवांसह महिला वर्गाणी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ऑल इंडिया धनगर महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे आणि ज्योतिलिंग बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुबंईचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे यांनी केले आहे.
0 Comments