जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा

 छत्रपती शिवाजी महाराज फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : २७ सप्टेंबर,


               पनवेल, शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी संचालित सी असं एम यु ऑफ स्कूल ऑफ फार्मसी महाविद्यालयात  जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त अंगदान महादान या थीम वर महारॅली चे आयोजन करण्यात आले होते. अवयव दानाचे महत्व आणि याबाबतची जनजागृती महारॅली व पथनाट्यातून विषद करण्यात आली.
                 या महाअवयव दान रॅली चे उदघाटन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफ. डॉ. के. अल. वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.हि रॅली महाविद्यालय ते अजिवली गाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत घोषणा देत जनजागृती करण्यात आली. या वेळी गावकर्यांना अंगदाना विषयी माहिती पत्रके वितरित कारण्यात आले. अजिवली येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफीसर डॉ. प्रभाकर पाटील आणि ए एच ओ संदेश भगत यांनी ग्रामस्थांना अंगदान महादान यावर मार्गदर्शन केले. 
                यात २०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या महावयाव दान रॅलीत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफ. डॉ. के. अल. वर्मा, निबंधक प्रोफ. डॉ. आर पी शर्मा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफ. डॉ. मोहसीन हसन, प्रा. वनिता लोखंडे प्राथमिक आरोग्य विभागातील संदेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर