रायगडात धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा, धनगर समाजाच्या वतीने महत्वपूर्ण बैठक संपन्न

 रायगडात धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा, धनगर समाजाच्या वतीने महत्वपूर्ण बैठक संपन्न




पाताळगंगा न्यूज ( दत्तात्रय शेडगे )
खोपोली : १७ सप्टेंबर,


             राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सगळी कडे धनगर समाजाने  आक्रमक पवित्रा घेतला असून ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलन होत आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातील धनगर समाज ही आक्रमक झाला असून येत्या काही दिवसांत अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर  समाजाचा भव्य  मेळावा घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्यांचे समजते.
                  या मोर्चाची तयारी करण्यासाठी काल महत्वपूर्ण बैठक समाजाच्या पदाधिकाऱ्यांची  नागोठणे येथे पार पडली, या बैठकीत आगामी काळात धनगर समाजाचा मोर्चा काढून धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र द्यावे यासाठी मागणी करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला( एसटीचे  सर्टिफिकेट ) धनगर आरक्षण मिळावे   यासाठी मोर्चे आंदोलन होत आहेत मात्र कोणत्याच सरकारने या मागणीकडे गाभिर्याने घेतले नसल्याने आता पुन्हा राज्यातील धनगर समाज सगळी कडे मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहेत.                                                                    त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व संघटना, गट ,तट, पक्ष बाजूला ठेवून सकल धनगर समाजाने एकत्र येत या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे,  या मोर्च्याची तारिख लवकरच कळविण्यात येईल असे पदाधिकऱ्यांनी सांगितले आहे.या बैठकीला धनगर समाजाचे ऍड संतोष आखाडे, माजी सरपंच मधुकर ढेबेधाऊ ढेबे, रविंद्र झोरे, चंद्रकांत शिंगाडे, रामभाऊ केंडे, शिक्षक लक्ष्मण ढेबे, धाऊ केंडे, चंद्रकांत केंडे, रवींद्र बावदाने,चंद्रकांत बावदाणे, आवेश कोकले, भास्कर बावदाणे आदींसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न