मुख्याध्यापिका मनिषा सानप यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

 मुख्याध्यापिका मनिषा सानप यांना  राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान



पाताळगंगा न्यूज (  दत्तात्रय शेडगे )
खालापूर : १७ सप्टेंबर,


      खालापुर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली येथील उपक्रमशील मुख्याध्यापिका मनिषा सानप यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन सन २०२३  चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार महाड पोलादपुरचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते  नुकताच प्रदान करण्यात आला.
               मुख्याध्यापिका मनीषा सानप या  माहिती तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल,  इंटरनेट इत्यादी  माध्यमाच्या  काळाबरोबर काम करीत आहात समाजाप्रती आपली असलेली निष्ठा आणि प्रेम यामुळेच  समाजाच्या विविध क्षेत्रात  कामे केली आहेत. शिक्षण क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेऊन आज अविष्कार फाउंडेशन इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार आज महाड येथे आमदार भरतशेठ गोगावले,हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोरभाई धारीया,अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक संजय पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
             मुख्याध्यापिका मनिषा सानप ह्या  जांभिवली शाळेत मुख्याध्यापिका असुन त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती जांभिवली व सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments

शासनमान्य खालापूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा  संपन्न