मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण

 मदन कोळी यांच्या निवासस्थानी श्रीस्वामी समर्थ देखाव्याने भक्तिमय वातावरण





पाताळगंगा न्यूज : ( संजय कदम )
पनवेल : २१ सप्टेंबर,


                 लोकमान्य टिळक यांना अभिप्रत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गेली ६२ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे मदन कोळी, परिवार यांनी या वर्षीच " असे प्रकटले श्रीस्वामी समर्थ " या देखाव्यात रंगत आणलेली आहे.
                     हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट राहुल भोईर, भुषण भोईर, विजय भोईर, वैभव चौगुले, यांची आहे. तसेच पडदा पेंटींग श्री. रमेश डुकरे, निवेदक अर्थव गोडबोले, तर विद्युत रोषणाई जनार्दन केणी, नवीन पनवेल यांनी साकारलेली आहे. सदर देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर