राजिप शाळा तळवली येथे विद्यार्थ्यांनी फुलविला भाजीचामळा,मुख्याध्यापक मस्तान बोरगे यांचे मोलाचे योगदान
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
तलवली : १४ नोव्हेंबर,
मराठी शाळा आता डिजिटल होत चालल्या असून विद्यार्थ्यांना घडविण्याचे मोलाचे योगदान शिक्षक वर्ग करीत आहे.शाळेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचे वडील हे शेतकरी असल्यामुळे शिक्षण समवेत घरच्या घरी भाजीचा मळा कसा पिकवायचा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळत आहे.या उद्देशाने या शाळेमध्ये वृक्षांचे महत्त्व च्या समवेत आपल्या सभोवताली असलेल्या जागेमध्ये भेंडी,वांगी,दुधी,मिरची,पालक,टॅ
सकाळी,सायंकाळी प्रत्येक वेळी हात पाय धुण्यासाठी पाण्याचा वापर होतो.मात्र हेच पाणी एका ठिकाणी जमा करुन या पासून भाजीचे पिक घेतले जावू शकते.त्याच बरोबर आपल्या दैनंदिन जिवनात आपल्या आहारात वापरु शकतो या विचारांतून विद्यार्थ्यांना शाळेय शिक्षणासमवेत भाजीपाला कसा लागवड करायचे यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले जात आहे.विद्यार्थ्यांना रोज जेवण शाळेत मिळत असतो मात्र आपल्या रोजच्या जेवणात पाळे भाज्याचा समावेश असावा या विचारांतून येथे भाजीपाला लागवड केली आहे.
आपल्या अल्पशा जागेमध्ये रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर करून ही पिके घेतली तर मानवाला कोणतेही अपाय कारक होवू शकत नाही.मात्र जास्त उत्पन्न आणी कमी वेळामध्ये घेतल्यामुळे यांच्या पासून विविध आजार निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणा समवेत सेंद्रिय खताच्या माध्यमातून भाजीपाला लागवड करण्याचे मार्गदर्शन करीत आहे.शाळेय पोषण आहारामध्ये या भाज्याचा समावेश असून दैनंदिन जिवनात भाजीपाल्यांचा प्रश्न मार्गी लागत आहे.
------------- चौकट -------------
शैक्षणिक आभ्यासाच्या माध्यमातून खत कसे तयार करायचे यांचे मार्गदर्शन दिले जात आहे.या शाळेच्या सभोवताली अनेक वृक्ष असुन यांचा पडलेला पाळा कुजून खताची निर्मिती केली जात आहे.शिवाय विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेसाठी ठेवण्यात आलेले पाणी काळव्याच्या माध्यमातून लागवड केलेल्या भाजी - पाळ्यापर्यंत पोहचत असून याचाही सदउपयोग होत आहे. (
राजिप शाळा तळवली मुख्याध्यापिका - मस्तान बोरगे )




0 Comments