चौक ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्यमान भव अंतर्गत लहान मुलांची आरोग्य तपासणी

 चौक ग्रामीण रुग्णालय येथे आयुष्यमान भव अंतर्गत लहान मुलांची आरोग्य तपासणी




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
चौक : १८ सप्टेंबर, 

                   आयुष्यमान भव या माध्यमातून दर आठवड्याला आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येत असते.सामुदायिक आरोग्य केंद्र चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये वजन,उंची,रक्त,कुपोषित आश्या विविध तपासणी या ठिकाणी करण्यात आली.यावेळी शेकडो लहान मुलांची तपासणी करण्यात आली.तसेच ज्या लहान मुलांचे काही अंशत शास्त्रक्रिया करावयाचे असेल तर,कळंबोली अथवा अन्य हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी रुग्णालय सहकार्य करीत असते.

                   आपल्या परिसरात कुणीही मुलगा कुपोषित राहू नये यासाठी वैद्यकीय अधीक्षक - सविता काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे तपासणी करण्यात आली.तसेच मुले कुपोषित होवू नये यासाठी त्यांच्या आहारा विषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी डॉ. आश्लेषा ओव्हाळ,डॉ. राजन यादव,वैद्यकीय डॉ. राम शेट्ये,औषध निर्माण अधिकारी - योगीता रुपाटे,आरोग्य सेविका - अश्विनी पाटील,सकु तडवी,समुपदेशन - अशोक लोंढे अदिच्या उपस्थित हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

     

Post a Comment

0 Comments

उरण मध्ये कॉग्रेसच्या महेंद्र घरत आणि आमदार महेश बालदी यांच्यात होणार काटे की टक्कर...