वडवळ येथे नाचणी पिक शेती शाळेचे आयोजन

 वडवळ येथे नाचणी पिक शेती शाळेचे आयोजन             


      

पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडवळ : १८ सप्टेंबर,

                     बदलत्या वातावरणामुळे येणाऱ्या कीड रोगाबाबत कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कीड व रोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी रोग व किडीचा जीवनक्रम ओळख व त्यावर उपाय याबाबत सविस्तर माहिती उपस्थित शेतकरी बांधवांस सांगण्यात आली.हा उपक्रम वडवळ घेण्यात आला.यावेळी खालापूर तालुक्यातील  तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत नाचणी पीक शेती शाळेचे आयोजन  करण्यात आले.
                   यावेळी  नाचणी पिकावरील करपा रोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यावर कार्बनडेंजीन ५० % डब्ल्यू पी २०  ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी  सुनील निंबाळकर मंडळ कृषी अधिकारी  - जगदीश देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक  .धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक सागर माने व  रावसाहेब आंधळे यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments

जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा