शिरवली येथील आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराला उत्फुर्द प्रतिसाद,युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित

 शिरवली येथील आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराला उत्फुर्द प्रतिसाद,युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित




हनुमंत मोरे : ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली/ वावोशी : ६ सप्टेंबर,

                शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे खालापूर तालुका युवासेना अधिकारी महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराला छत्तीशी विभागातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा उत्फुर्द प्रतिसाद मिळाला.शिबिर तपासणी करण्यासाठी आलेल्या लोकांची तपासणी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,नेरुळ,नवी मुंबई यांचे तज्ञ डॉ.अधिकराव लोखंडे, डॉ.रविंद्र कदम, डॉ.प्रविण शिरोडे, डॉ .सुनिल जाधव, कु.चंद्रकांत भांगे,कु.रोशनी कांबळे,कु.माया माळी यांनी केली.
            या शिबिरात ब्लड प्रेशर,शुगर,ई.सी.जी.तपासणी,डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप,शिबिरासाठी उपस्थित राहिलेले डॉ.अधिकराव लोखंडे, डॉ.रविंद्र कदम, डॉ.प्रविण शिरोडे, डॉ .सुनिल जाधव, कु.चंद्रकांत भांगे,कु.रोशनी कांबळे,कु.माया माळी आदी तज्ञांनी रुग्णांची तपासणी केली.

                शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील हे इंजिनिअर असून युवा मतदारांचे ते आयकॉन म्हटले तर चुकीचे ठरणार नाहीत.सामाजिक कार्याची आवड असल्याने ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या सतत संपर्कात राहतात त्यामुळे त्यांनी स्वतःची अशी वेगळीच ओळख निर्माण केलेली दिसत आहे.त्यांचा वाढदिवस म्हणजे युवा वर्गाचा आनंदोत्सव असेच काहीसे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहायला मिळाले.
                 आपल्या वाढदिवसानिमित्त परिसरातील लोकांची तपासणी करण्यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,नेरुळ,नवी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांची टीम बोलाविली होती.या शिबिराला परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविल्याने महेश पाटील यांचा सर्वसामान्य लोकांनी किती जवळीक आहे हे दिसून येते.त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद देण्यासाठी शिवसेनेचे नेते डॉ.सुनिल पाटील, एकनाथ पिंगळे, सुरेशदादा कडव,भाऊ सणस आदी अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,