शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरवणे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन,

 शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरवणे येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन,

 
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन चिलठण,यांचा पुढाकार 

माय मराठी न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २७ फेब्रुवारी,


 
           शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी,तसेच टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूच निर्मिती करून या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनात वापरता येऊ शकते.या उदात्त विचारातून हे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत “बाल विज्ञान शोधिका चिलठण,यांच्या माध्यमातून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरवणे,येथे घेण्यात आले.ह्या प्रदर्शनाचे अनावरण मुख्याध्यापिका - मोरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

               प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन अंतर्गत “बाल विज्ञान शोधिका चिलठण, खालापूर येथे सातत्याने विद्यार्थ्यास प्रयोगा विषयी येथिल शिक्षक मार्गदर्शन करीत असतात.तसेच प्रयोग हा आपल्या दैनंदीन जीवनात अतिशय महत्वाचा मानले जात असल्यामुळे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या प्रयोग विषयी आत्मियता वाढत आहे, हे साकारण्यासाठी दोन दिवस विद्यार्थ्यास प्रशिक्षण देण्यात आले.

            शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरवणे,पेण येथे  प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रदर्शन दाखवित उपस्थितांची मने जिंकली.या परिसरातील ग्रामस्थ,पाचशे हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.या विज्ञान प्रदर्शनास 45 प्रतिकृती, तसेच 90 विद्यार्थ्यांनी हे प्रयोग सादर केले होते, यावेळी शिक्षक, कर्मचारी यांचा सहभाग लाभला.या उपक्रमास दिल्ली (प्रोग्राम असोसिएट) - गौरव बोहरा,सेंटर इंचार्ज - ⁠रणजीत वाघमारे,प्रथम मुंबई ऑफिस - ⁠सुहास येडे,⁠अश्विनी भगत,विजय वानखडे,अमोल भुसारी आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments

प्रिन्स इलेव्हन क्रिकेट संघ कलोते यांच्या वतीने मैत्री चषक,नाईट क्रिकेट सामने संपन्न,