रानभाज्यांचे संवर्धन आवश्यक - आमदार अनिकेत तटकरे महिला बचत गट भवन उभारणीसाठी २५ लाख रुपये निधी देणार

 रानभाज्यांचे संवर्धन आवश्यक - आमदार अनिकेत तटकरे महिला बचत गट भवन उभारणीसाठी २५ लाख रुपये निधी देणार




कृष्णा भोसले : ( पाताळगंगा न्यूज )
तळा : २ सप्टेंबर,


            आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी रानभाज्या व पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व खुप आहे तसेच  इतर भाज्या व इतर तृणधान्या पेक्षा अधिक मागणी रानभाज्या व पौष्टिक तृणधान्याला आहे. आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ खुप आवश्यक आहेत.त्यामुळे रानभाज्यांचे व पौष्टिक तृणधान्याचे संर्वधन करण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे ते आपल्या सर्वांचे कार्तव्य आहे, असे प्रतिपादन  महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुरस्कृत  किसान नवकृषक फार्मर्स प्रोडयुसर कंपनी लि.तळा या कंपनीच्या कार्यलयाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे  ते मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.

            रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे अनावरण  आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी तळा व  एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प यांच्या संयुक्तविद्यमाने  रानभाज्या व पौष्टिक तृणधान्य मोहत्सव तसेच पोषण महिना यांचे आयोजन आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात होते. यामध्ये सुमारे ८० महिलांच्या वतीने विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. महिला व बालकल्याण विभागाचा पोषण माहिना सुरू आहे या अंतर्गत रानभाज्या व पौष्टिक तृणधान्या पासून तयार करण्यात आलेल्या विविध पाककला प्रदर्शनात ठेवण्यात आले.
         

   तसेच तसेच आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत जनजागृतीसाठी त्यामध्ये पौष्टीक तृणधान्ये उत्पादन तंत्रज्ञान व पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत माहितीचे स्टॉल सुद्धा लावण्यात आली होता. आ.अनिकेत तटकरे यांनी सर्व स्टॉलांना भेट देऊन पाहणी केली.तसेच कृषी विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी चांगला उपक्रम राबविला असल्याचे नमूद केले या कार्यक्रमा प्रसंगी त्यांनी महिलांसाठी महिला बचत गट भवन उभारणीसाठी २५ लाख निधी देण्याची घोषणा सुद्धा केली.
                   या  घोषणेमुळे महिलावर्गाने आनंद व्यक्त केला.तसेच या नंतर कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडेल यांचे वाटप अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
           यावेळी नगरपंचायत उपसभापती चंद्रकांत रोडे यांनी सुद्धा या कर्यक्रमास मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास नगरपंचायत उपसभापती चंद्रकांत रोडे, तहसीलदार स्वाती पाटील, तालुका कृषी अधिकारी आनंद कंबळे,बालविकास प्रकल्प अधिकारी दिपाली शेळके,नगरपंचायत सदस्य माधुरी घोलप,रितेश मुंडे,अध्यक्ष रा कॉ पा नाना भुवड,महिला अध्यक्ष रा कॉ पा जान्हवी शिंदे,माजी उपसभापती गणेश वाघमारे चंद्रकांत बोरावकर,उत्तम जाधव,बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाउपध्यक्ष भास्कर गोळे,                                                    शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष मधुकर वारंगे मार्गदशक राजेश मांजरेकर,राम मोहिते,व सरपंच शेतकरी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद कंबळे व आभार प्रदर्शन दिपाली शेळके यांनी केले तसेच सूत्र संचालन वावेकर मॅडम यांनी केले या नंतर नियोजना प्रमाणे विविध तज्ञ मार्गदर्शक यांचे परिसंवाद घेण्यात आले.




Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात