बागेची वाडी येथे आमदार महेश बालदी यांच्या शुभ हस्ते घरकुल योजनेचा भूमिपूजन

 बागेची वाडी येथे आमदार महेश बालदी  यांच्या शुभ हस्ते घरकुल योजनेचा भूमिपूजन



राम ढेबे : ( पाताळगंगा न्यूज )
आपटा : २ सप्टेंबर, 

            आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई बागेची वाडी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून याठिकाणी आदिम घरकुल योजना आणि विशेष केंद्रीय अर्थ सहाय्य योजने अंतर्गत एकूण  ५४ पक्क्या घरकुलांचे निर्माण करण्यात आले.या वाडीत एकूण ५८ कुटुंब असून,येथील सर्व कुटुंबांचे पक्के घरकुल बांधण्याचे कार्य सुरू आहे.शेवटच्या ११ घरकुल बांधकामाचे भमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या शुभ हस्ते आपटा ग्रामपंचायत अंतर्गत सारसई बागेची वाडी येथे घरकुल योजनेचा  भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या वाडीला लवकरच आदर्श वाडीचा सन्मान मिळेल अशी आशा आमदार यांनी  बोलताना व्यक्त केली.
              त्याच प्रमाणे माडभुवन आणि घेरावाडी यांचे देखील पुनर्वसनाचे प्रस्ताव लवकरच मंजूर होतील यासाठी मी स्वतः मंत्रालय स्तरावर जलद गतीने पाठपुरावा करित आहे असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.तसेच  या वाडीमध्ये सुसज्य असे बहु उद्देशीय सभागृह बांधण्यात येईल जिह्यातील इतर वाड्याना या वाडीपासून नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच इरशावाडीतील संकल्पित आराखड्याचे प्रकाशन देखील ग्रामस्थांसमवेत करण्यात आले.
            ग्रामस्थांनी पाना फुलांची रस्त्यावर रांगोळी काढून माझे स्वागत केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.यावेळी जि. प.सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, ज्ञानेश्र्वर भोईर ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश वाकडीकर,विजय मिरकुटे, विद्या जोशी,विद्या मोकल,चंद्रकांत पाटील दिनेश पाटील,गणेश पाटील,जीवन टाकले सामजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच माडभुवन घेरावाडी आणि विविध वाड्यांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान