मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात....टेंपोला दिली ट्रेलरने आणि टँकरने जोरदार धडक दोन जण जखमी ....
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : १ ऑक्टोबर,
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरू असून आज रात्री एका उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिली तर ट्रेलरला टँकरने जोरदार धडक देऊन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात दोन चालक जखमी झाले आहेत.
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर माजगाव आंबिवली ब्रिज जवळ टाटा टेम्पो क्रमांक MH12NX5129)हा टेम्पोचा टायर पंचर झाल्याने तो काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभा होता मात्र पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलर (क्रमांक MH46AF5014) वरील चालकाचे ट्रेलर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने टेम्पोला जोरदार धडक दिली ,तर ट्रेलरला भरधाव वेगात येणाऱ्या टँकरनेक्रमांक(MH42Y4758)ट्रेलरला जोरदार धडक देऊन तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.
या अपघातात ट्रेलर चालक राजेंद्र प्रसाद विश्वकर्मा ,आणि टँकर चालक महादेव गुट्टे हे जखमी झाले आहेत,या अपघाताची माहिती मिळताच पलस्पे महामार्ग पोलीस, आणि आयआरबी स्टाफ तत्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला तर जखमी चालकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले
0 Comments