खोपोली भारतीय जनता पार्टच्या वतीने स्वच्छता अभियान संपन्न
पाताळगंगा न्यूज ( दीपक जगताप )
खालापूर : २ ऑक्टोबर,
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सर्व देशवासियांना १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता मोहिमेत आपले श्रम दान करण्याचे आवाहन केले. होते, आपले शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता माझा सक्रिय सहभाग आहे! आपणही आपला सहभाग नोंदवा आणि ०१ ऑक्टोबर रोजी श्रमदान मोहिमेत सहभागी व्हा!
एक तारीख, एक तास, एकमेकांसोबत...
या अभियान निमित्ताने साजरा होणाऱ्या स्वच्छ्ता पंधरवड्यात आमदार प्रशांत दादा ठाकुर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांचा मार्गदर्शना खाली खोपोली शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने खालची खोपोली स्मशान भूमी मध्ये सकाळी १० वाजता भाजप शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर व राहुल जाधव अभियान प्रमुख कर्जत विधानसभा, संजय म्हात्रे अभियान प्रमुख खोपोली शहर यांचा उपस्थितीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमा मध्ये स्वच्छतेची शपथ आणि माझी वसुंधरा शपथ सामूहिक रित्या घेण्यात आली.सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, विकास खुरपडे, रमेश मोगरे, दिलीप पवार, सुर्यकांत देशमुख, कृष्णा पाटील, अनिल कर्णूक, राकेश दबके, वामनराव दिघे, रामभाऊ पवार, संजय कचरे, अजय इंगुळकर, हेमंत भाटिया, गिरीश अभाणी, गणेश ठाकरे, जयवंत वाघ, शमकरण राय, अश्विनी अत्रे, गीता मोहिते, सुमिता महर्षी, अस्मि सावरेकर व भाजप पदाधिकारी कार्यकर्तेत्यांनी या अभियानात सहभाग घेतला.स्वच्छता अभियाना मध्ये सर्वांनी सहभाग घेऊन सहकार्य केल्या बद्दल अभियान प्रमुख संजय म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments