कोणी स्मशान भुमी बांधून देता का ? पौध,व माजगांव आदिवासी बांधवांचा संतप्त सवाल

 कोणी स्मशान भुमी बांधून देता का ? पौध,व माजगांव आदिवासी बांधवांचा संतप्त सवाल 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली ८ ऑक्टोबर


           ग्रूप ग्राम पंचायत माजगांव हद्दीत असलेल्या पौध आणी माजगांव आश्या दोन अदिवासी वाडीतील ग्रामस्थांना स्मशान भुमी नसल्यामुळे पौध येथिल असलेल्या पाताळगंगेच्या किना-यावर अंतिम संस्कार करण्यांची वेळ आली आहे.गेले अनेक वर्ष या आदिवासी बांधवांना स्मशान भुमी नाही ही मोठी शोकांतिका आहे. निवडणुकांमध्ये मत घ्यायची अश्वासन देयाचं हेच पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आहे.पावसाळ्यात अंतिम संस्कार करायचे म्हटले जिव धोक्यात घालून करावे लागते.केव्हा नदिला पुर येइल हे सांगता येत नाही.मात्र असे सर्व दृश्य असले तरी सुद्धा या दोन्ही अदिवासी वाडीतील या स्मशान भुमी पासून अजूनही वंचित आहे.
               पाताळगंगेच्या किनाऱ्यावर एका दगडावर लाकडे रचून विधी केली जाते.शिवाय स्मशान भुमी नाही तर निवारा शेड कोठून येणार प्रत्येक वेळी ही वस्तू स्थिती आहे.एकीकडे आपले जग डिजिटल बनत चालले असतांना,आदिवासी बांधवांना स्मशान भुमी नाही ही मोठी लाजिरवाणी बाब आहे.येथिल ग्रामस्थांनी अनेक वेळा या ठिकाणी आम्हाला स्मशान भुमी बांधून द्या मात्र अश्वासनांच्या पलीकडे केराची टोपली दाखविली जात आहे.
                 माजगांव ग्राम पंचायत चे निवडणुकीचे वारे वाहत असतांना, ग्रामस्थांनी या वर्षी मतदानांवर बहिष्कार टाकण्यांचा निर्णय घेणार असल्यांचे समजते.मात्र प्रत्येक गावाला स्मशानभूमी आहे.मग आमच्यावर अन्याय का? असा सवाल येथिल ग्रामस्थ करीत आहे.गेले अनेक पिढ्या उघड्यावर अंतिम संस्कार करीत आहे.मात्र त्यांचे कुणालाही सोयर सुतक नाही.मग आम्ही फक्त मतदान करायचं का ? आणी पुढा-यांची खोटी आश्वासन पालन करायची मात्र आता तरी लोक प्रतिनिधी जागे होवून आम्हाला स्मशान भुमी देतील का ? अशी वेळ या अदिवासी बांधवांवर आली आहे.

कोट 

     गेली अनेक पिढ्यांपासून आम्हाला स्मशान भुमी नाही,शिवाय आमच्या वाडीपासून दोन कि.मी अंतर चालत जावून पौध येथिल पाताळगंगा च्या किनाऱ्यावर अंतिम संस्कार केले जाते,या ठिकाणी उभे राहण्यासाठी उत्तम आशी जागा नाही.मात्र गेले अनेक वर्ष अश्वासनांची खैरात शिवाय पदरी पडत आहे ( नामदेव वाघमारे - ग्रामस्थ - सामाजिक कार्यकर्ते )

कोट 
पौध आणी माजगांव आदिवासी यांना स्मशान भुमी साठी आमचे प्रयत्न सुरु आहे.आमदार निधीतून स्मशान भुमी बांधली जाईल यासाठी  पाच ते सहा महिन्यापुर्वी प्रस्ताव पाठविला आहे.सध्या निवडणुकीची रणधुमाळी असल्यामुळे निवडणूक झाल्यानंतर तातडीने त्यांचा प्रश्न मार्गी लावले जाईल ( ग्रूप ग्राम पंचायत माजगांव ग्रामसेवक -  संदिप धारणे 

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,